महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे
कृपया प्रत्येक सूचना वाचून नोंदणीला जा.

सूचना

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१७ परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सूचना

खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.

१. नोंदणी.

२. अर्जातील माहितीची पडताळणी करणे.

३. ऑनलाईन शुल्क भरणे.

४. आवेदनपत्राची प्रिंट घेणे.

१. नोंदणी नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.

www.mahatet.in या संकेस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या 'उपक्रम' मधील 'नवीन नोंदणी करा' या Tab वर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील पुढील सूचना काळजीपूर्वक वाचून शेवटी असलेल्या नवीन नोंदणीला जा व अर्ज भरा या लिंकवर क्लिक करा. त्या नंतर उघडलेल्या पेजवरील 'Click for Registration' या पिवळ्या रंगाच्या Tab वर क्लिक करा. नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.

१. अर्जदाराचे आडनाव, प्रथमनाव व वडिलांचे / पतीचे नाव (आडनाव नसेल तर आडनावाच्या चौकटीत (-) असे संयोगचिन्ह भरा.

२. एस.एस.सी प्रमाणपत्रानुसार जन्मदिनांक, एस.एस.सी. प्रमाणपत्र क्रमांक, उत्तीर्णतेचे वर्ष व बैठक क्रमांक अचूकपणे भरा.

३. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्यास 'होय' अथवा नसल्यास 'नाही' वर क्लिक करा. होय पर्यायावर क्लिक केल्यास उघडलेल्या दोन चौकटीमध्ये प्रमाणपत्राचा क्रमांक व प्रमाणपत्र वितरीत केल्याचा दिनांक नमूद करा.

३.१ आधार कार्ड असल्यास 'होय' अथवा नसल्यास 'नाही' पर्याय निवडा. होय पर्याय निवडल्यास उघडलेल्या चौकटीत आधार क्रमांक अचूक नमूद करा.

४. संपर्क माहितीमध्ये पहिल्या चौकटीत दहा अंकी मोबाईल क्रमांक अचूक टाईप करा, दुसऱ्या चौकटीत आपला ईमेल आयडी नमूद करा.

५. अर्जदार पुरुष, स्त्री की ट्रान्सजेन्डर आहे ते अचूकपणे निवडा.

६. अर्जदाराचा कायमचा पूर्ण पत्ता यामध्ये सर्व्हे क्रमांक, घर क्रमांक, गल्ली क्रमांक, सोसायटीचे नाव (असल्यास) नानुड करावे. शहराचे / गावाचे नाव, पोस्ट (असल्यास) ठिकाण टाईप करावे. जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडावे. अर्जदार महाराष्ट्राबाहेरील असल्यास ‘ Out of Maharashtra ‘ हा पर्याय जिल्ह्याच्या Dropdown लिस्ट मधून निवडा. त्यानंतर उघडलेल्या चौकटीत तालुका नमूद करा.

७. जातीचा प्रवर्ग Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

८. दिव्यांग असल्यास ‘ होय ’ अथवा नसल्यास ‘ नाही ’ पर्याय निवडा. होय पर्यायावर क्लिक केल्यास दिव्यांगत्वाची टक्केवारी, प्रमाणपत्र क्रमांक, लेखनिक हवा की नाही याची माहिती अचूकपणे नोंदवा (दिव्यांगत्व ४० किंवा त्यापेक्षा अधिक टक्के असल्यास परीक्षा शुल्कात सवलत व लेखनिकाची मदत मिळेल.)

९. ज्या वर्गासाठी (स्तरासाठी) शिक्षक पात्रता परीक्षा द्यावयाची आहे ते Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा. इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर १) आणि इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर २) साठी अर्जदार पात्र असल्यास आणि दोन्ही परीक्षेस बसण्यास इच्छुक असल्यास ‘ For Both / दोन्ही साठी ‘ हा पर्याय निवडा. (दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.)

१०.शैक्षणिक पात्रता या मुद्यामध्ये पेपर १ ( कनिष्ठ प्राथमिक स्तर) साठी एस.एस.सी, एच.एस.सी.ची माहिती प्राप्त गुण, एकूण गुण, मंडळ/बोर्ड, टक्केवारी/श्रेणी ओ उत्तीर्ण वर्ष याबाबत अचूकपणे नोंद करावी. पेपर २ (वरिष्ठ प्राथमिक स्तर) साठी एस.एस.सी, एच.एस.सी., पदवी तसेच पदव्युत्तर पदवी (असल्यास) ची माहिती प्राप्त गुण, एकूण गुण, मंडळ/बोर्ड, टक्केवारी/श्रेणी ओ उत्तीर्ण वर्ष याबाबत अचूकपणे नोंद करावी.

११. व्यावसायिक पात्रता मध्ये पेपर १ (कनिष्ठ प्राथमिक स्तर) यासाठी शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड. किंवा समकक्ष) बाबतची माहिती पदविकेचे नाव, अभ्यासक्रम कालावधी (वर्ष), निकाल, टक्केवारी / श्रेणी, उत्तीर्ण वर्ष अचूकपणे नोंदवा. पेपर २ (वरिष्ठ प्राथमिक स्तर) यासाठी शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड. किंवा समकक्ष) अथवा शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड. किंवा समकक्ष) बाबतची माहिती पदवी / पदविकेचे नाव, अभ्यासक्रम कालावधी (वर्ष), निकाल, टक्केवारी / श्रेणी, उत्तीर्ण वर्ष अचूकपणे नोंदवा. अर्जदार शिक्षणशास्त्र पदवी किंवा शिक्षणशास्त्र पदविका दोन्ही उत्तीर्ण असल्यास दोन्हींची माहिती अचूकपणे नोंदवा.

१२. प्रथम व द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल. प्रथम भाषा उर्दू निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल.

१३. परीक्षेचे माध्यम या परीक्षेची प्रथम भाषा जी निवडली असेल, ते असेल.

१४. अर्जदार ज्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे, तो जिल्हा Dropdown लिस्ट मधील अचूकपणे निवडा.

१५. आयडेनटीटी प्रुफ ( ओळखीचा पुरावा) म्हणून पहिल्या चौकटीतील Dropdown लिस्ट मधून आपल्याकडे पुरावा असलेल्या कोणत्याही एका पर्यायाची निवड करा. दुसऱ्या चौकटीत त्याचा क्रमांक नमूद करा.

१६. स्क्रीनवरील CAPTCHA पाहून त्याखालील चौकटीत टाईप करा.

१७. फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती-

अ) ३.५ से.मी. ४.५ से.मी. १०० KB चा रंगीत फोटो स्कॅन करावा. स्कॅन इमेज फोटो बॉर्डर पर्यंत क्रॉप करण्यात यावा. सदर इमेज ५ KB ते १०० KB या आकारामध्येच बसेल याची खात्री करून घ्यावी.

ब) .५ से.मी. ४.५ से.मी. चा चौकोन पांढऱ्या कागदावर आखावा त्यामध्ये काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरची स्वाक्षरी असलेले पृष्ठ ५० KB मध्ये स्कॅन करावे व क्रॉप करावा. स्वाक्षरीची इमेज २ KB ते ५० KB या आकारामध्ये बसेल याची खात्री करून घ्यावी.

  • •प्रतिज्ञापत्र वाचून ते मान्य असल्यास चौकटीत क्लिक करा आणि नोंदणी फॉर्म Save करा.
  • •नोंदणी फॉर्म मधील माहिती पूर्णपणे भरली नसल्यास स्क्रीनवर येणाऱ्या pop up नुसार आवश्यक माहिती भरा.
  • •Save केल्यानंतर ऑनलाइन नोंदणी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी क्रमांक (Login ID) व पासवर्ड SMS द्वारे प्राप्त होईल.
  • •प्राप्त झालेल्या Login ID व पासवर्ड द्वारे Login करून अर्ज भरण्याच्या पुढील टप्प्यावर जा.

महत्वाचे- उमेदवाराने एकापेक्षा अधिक आवेदनपत्रे भरल्यास सर्वात शेवटी भरलेले (लेटेस्ट) आवेदनपत्र स्वीकारले जाईल. अशा उमेदवारांची उर्वरित आवेदनपत्रे रद्द केली जातील. त्यामुळे उमेदवाराने आवेदनपत्र भरताना अचूकपणे माहिती भरण्याची दक्षता घ्यावी.

२. अर्जातील माहितीची पडताळणी

१. प्राप्त SMS मधील ID व पासवर्ड द्वारे Login केल्यावर नोंदणी केलेल्या अर्जाचा सारांश (Summary) स्क्रीनवर दिसेल.

२. भरलेल्या अर्जातील माहिती पाहण्यासाठी Preview या बटनावर क्लिक करा. स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.

३. माहितीत बदल करावयाचा असल्यास मागे जाऊन (Back) ‘Edit Application Form ‘ बटनावर क्लिक करून आवश्यक ते बदल करा आणि Update बटनावर क्लिक करा.

४. ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठी proceed to pay या बटनावर क्लिक करा.

५. यानंतर आपल्याला आवेदनपत्रातील माहितीत बदल करता येणार नाही.

३. ऑनलाइन शुल्क भरणे

proceed to pay बटनावर क्लिक के ल्यास ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड व एटीएम पीन, इंटरनेट बँकिंग, vallet / कॅश कार्ड व आय.एम.पी.एस. असे पर्याय उपलब्ध होतील.

१. आपणास सोयीस्कर असलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाइन शुल्क भरावे.

२. चलनाद्वारे / ऑफलाइन शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध नाही.

३. ऑनलाइन शुल्क भरतेवेळी इंटरनेट कनेक्शन नसणे, वीज जाने यामुळे शुल्क जमा न झाल्यास पुन्हा Login करून शुल्क ऑनलाइन भरावे.

४.शुल्क जमा झाल्यास स्क्रीनवर Payment Successful असा मेसेज येईल आणि ‘ Transaction Details’ स्क्रीनवर दिसतील.

४. आवेदनपत्राची प्रिंट घेणे.

१.शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी.

२. आवेदनपत्राची प्रिंट गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी यांचेकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.