सूचना
 
कृपया प्रत्येक सूचना वाचून नोंदणीला जा.

सूचना

महाटीईटी २०१५ परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सूचना

खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पाच प्रमुख टप्पे आहेत.

1. नोंदणी.

२. अर्ज पडताळणी व चलन प्रिंट काढणे .

३. बँकेत चलनाद्वारे फी भरणे.

४. फोटो , स्वाक्षरी व चलन अपलोड करावे .

५. आवेदनपत्र, चलन प्रत , राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र , अपंगत्व प्रमाणपत्र पत्र परीक्षा केंद्राच्या जिल्हातील संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी/शिक्षण निरिक्षक मुंबई (उ. द. प.) यांच्या कार्यालयात जमा करणे

1.  नोंदणी-
नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.

1. अर्जदाराचे नांव, वडिलांचे नाव व आडनाव [आडनाव नसेल तर आडनावाच्या चौकटीत (-) असे संयोगचिन्ह भरा].

2. एस.एस.सी. प्रमाणपत्रावरील नाव व जन्मदिनांक प्रमाणे नाव व जन्मदिनांक भरावे

३. अर्जदाराचा कायमचा पूर्ण पत्ता यामध्ये सर्व्हे क्रमांक, घर क्रमांक, सदनिका क्रमांक, गल्ली क्रमांक, सोसायटीचे नांव (असल्यास) शहराचे नांव, पोस्ट (असल्यास), जिल्हा, तालूका/तहसिल, पिनकोड, दूरध्वनी क्रमांक (एस.टी.डी. क्रमांकासह, असल्यास)

४. म.रा.प.प. कडून आलेला कोणताही मेसेज ज्यावर मिळू शकेल असा मोबाईल क्रमांक.

५. म.रा.प.प. कडून आलेला कोणताही मेसेज ज्यावर मिळू शकेल असा इ-मेल आय.डी.

६. महाराष्ट्राचा रहिवासी असाल तर होय निवडा अथवा नाही असे निवडा.

७. अर्जदार स्त्री आहे की पुरुष.

८. अर्जदार मागासवर्गीय असल्यास जातीचे प्रमाणपत्र व सदर प्रमाणपत्र मिळालेला दिनांक आवश्यक आहे. त्याची अर्जामध्ये नोंद करावयाची आहे. अन्यथा खुल्या प्रवर्गाचा उल्लेख करता येईल.

९. अर्जदार अपंग असल्यास त्याप्रमाणे उल्लेख करता येईल. जर लेखनिकाची गरज असेल तर परीक्षेपूर्वी किमान ८ दिवस आधी संबधित जिल्हा शिक्षणधिकारी (प्राथमिक)/शिक्षण निरीक्षक यांची लेखी पूर्व परवानगी घ्यावी लागेल.

१०. १ ली ते ५ वी, किंवा ६ वी ते ८ वी किंवा दोन्ही परीक्षांसाठी बसायचे याबाबत माहीती निवडावी लागेल

११. प्रथम भाषा व द्वीतीय भाषा यांचा उल्लेख करावा लागेल.

१२. शैक्षणिक अर्हतेमध्ये इ.१२ वी आणि पदवीचे मिळालेले एकूण गुण यांचा उल्लेख करावा लागेल. (आवश्यकतेप्रमाणे)

१३. व्यावसायिक अर्हतेची माहिती अचूकपणे भरा.

१४. अर्जदाराला ज्या जिल्ह्यामधून परीक्षा द्यावयाची आहे तो महाराष्ट्रामधील जिल्हा निवडावा लागेल.

१५. अर्जदाराने फोटो आयडेंटीटी प्रुफ साठी युनिक नंबर असलेला खालीलपैंकी कोणताही पुराव्याचा क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

a) निवडणूक ओळखपत्र

b) वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

c) आधार कार्ड

d) पासपोर्ट

e) पॅनकार्ड

f) राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक

वरीलपैकी कोणताही एक

कार्यपध्दती-

      अर्जदाराने अनिवार्य असलेली माहिती भरावी. ही माहिती संबंधित चौकटीजवळ लाल खुणेने दर्शविण्यात आली आहे. सर्व माहिती भरुन झाल्यानंतर अर्जदाराने प्रतिज्ञापत्र वाचूनच अर्ज सेव्ह करायचा आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसाठी अर्जाची पडताळणी होणार आहे. शासननिर्णयामधील अर्हतेनुसार अर्जदार पात्र होत नसेल तर त्याप्रमाणे संबंधित माहितीच्या उजव्या बाजूला पडताळणीबाबत मेसेज दिसेल. त्याप्रमाणे अर्जदाराने कोणत्या पेपरसाठी अर्ज केला आहे व अर्हता काय आहेत यांची खात्री करावी. अपात्र असणा-या अर्जदाराचा अर्ज स्विकारला जाणार नाही.

      पात्र होणा-या अर्जदाराचा अर्ज स्विकारला जाईल व त्यालाच नोंदणी क्रमांक मिळेल. अर्जदाराने नोंद केलेल्या मोबाईल व इ-मेल आयडी वर अर्ज स्विकृत झाल्याचा मेसेज लगेचच येईल आणि अर्ज क्रमांक व पासवर्ड या मेसेजमध्ये नमूद केलेला असेल.

२ अर्जपडताळणी व चलन प्रिंट -

कार्यपध्दती-

      अर्जपडताळणीसाठी अर्जामध्ये भरलेल्या सर्व माहितीची पुनश्च पडताळणी करता येईल. जर काही दुरुस्ती करावयाची असल्यास तीही करता येईल.

      सेव्ह झालेल्या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर चेंज/एडिट हे बटन क्लिक करुन बदल / दुरुस्ती करता येईल.

      भरलेल्या माहितीच्या अचूकतेची खात्री झाल्यानंतर चलन प्रिंट बटन क्लिक करता येईल पंरतू त्यानंतर मात्र अर्जामध्ये काहीही बदल करता येणार नाही.

      चलन प्रिंट क्लिक केल्यानंतर प्रिंट होण्यासारखा आशय (चलनाचा) स्क्रिनवर दिसेल तो ए4 आकाराच्या कागदावर प्रिंट करुन घ्यावा.

      बँक चलन तीन प्रतींमध्ये दिसेल. त्यामध्ये पहिली बँक प्रत, दुसरी अर्जदाराची प्रत व तिसरी परिषदेची प्रत आहे. प्रिंट झालेल्या चलन प्रतीमध्ये अर्जदाराची किती फी भरायची आहे ती माहिती नमूद करण्यात येईल. यानंतर तुम्ही लॉग आउट होउन पुढील टप्प्याकडे जाऊ शकता.

३. शुल्क / फी भरण्याची कार्यपध्दती -

      वर नमूद करण्यात आलेल्या चलन प्रतीचा उपयोग करुन एस.बी.आय. किंवा एस.बी.एच. च्या कोणत्याही शाखेमध्ये विहित शुल्क / फी चा भरणा करण्यात यावा. चलनावर निर्धारित केलेल्या जागेवर बँकेकडून ब्रँच कोड व ट्रन्झॅक्शन आय.डी व फीची रक्कम नमूद करण्यात यावी.

      सेव्ह बटन वापरुन पुढील टप्प्यावर जाता येईल.

४. फोटो , स्वाक्षरी आणि चलन अपलोड -

      या टप्प्यासाठी अर्जदाराचा सध्याचा फोटो व स्वाक्षरीची इमेज उपलब्ध असणे आवश्यक आहे.

कार्यपध्दती-

अ) ३.५ से.मी X ४.५ से.मी., ५० KB चा रंगीत फोटो स्कॅन करावा. स्कॅन इमेज फोटोबॉर्डरपर्यंत  क्रॉप करण्यात यावी. सदर इमेज ५ के.बी ते ५० के.बी या आकारामध्येच बसेल याची खात्री करुन घ्यावी. इमेज जेपीजी फाईल मध्ये असणे आवश्यक आहे.

      ब) ४.५ से.मी X १.५ से.मी. चा चौकोन पांढ-या कागदावर आखावा. त्यामध्ये काळ्या शाईच्या पेनने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरची स्वाक्षरी असलेले पृष्ठ ५० KB मध्ये स्कॅन करावे व क्रॉप करावे. स्वाक्षरीची इमेज २ KB ते ५० KB या आकाराची असेल याची खात्री करा. स्वाक्षरीची इमेज जेपीजी फाईलमध्ये असणे आवश्यक आहे.

      क) बँकेत शुल्क भरलेल्या चलनाची प्रत १५० kb पर्यंत स्कॅन करून अपलोड करावी.

      ड) तुमच्या संगणकावर फोटो , स्वाक्षरी व बँकेत शुल्क भरलेल्या चलनाची अपडेट प्रत अर्जा मधील भागावर ब्राउज करून अपलोड बटन क्लिक करा.

      तिन्ही इमेजस अपलोड झाल्यानंतर अर्जामध्ये दिसतील .

स्वाक्षरी, फोटो व चलन अपलोड झाल्यानंतर पुढील टप्प्यावर जाण्यासाठी अर्ज प्रिंट वर जावे लागेल.

5. प्रिंटेड आवेदनपत्राची प्रत निवडलेल्या परीक्षा केंद्राच्या जिल्ह्यातील संबंधीत गटशिक्षण अधिकारी (शहरी भागासह)/शिक्षण निरीक्षक मुबई (उ. द. प.) यांना सादर करावी.

वरील टप्प्या नंतर आवेदनपत्राची प्रिंट घेऊन आवश्यक प्रमाणपत्रासह (बँक चलन प्रत व गरजे नुसार जात प्रमाणपत्र , अपंग प्रमाणपत्र) आवेदनपत्र उमेदवाराने निवडलेल्या परीक्षा केंद्राच्या जिल्हातील संबंधित गटशिक्षण अधिकारी/शिक्षण निरीक्षक मुबई (उ. द. प.) यांच्या कडे पडताळणीसाठी सुपूर्द करणे व त्यांची पोहोच पावती स्वत:कडे घेणे यानंतर आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

      ज्या अर्जदांरानी वरीलप्रमाणे पाचही टप्पे पूर्ण केले आहेत तेच उमेदवार परीक्षार्थी म्हणून महाटीईटी परीक्षेस त्यांची प्रमाणपत्रे पडताळणीस अधीन राहून प्रविष्ट होउ शकतात.